₹260.00
म्हटलं तर हे आत्मकथन आहे. मध्यमवर्गात जन्मलेली लेखिका अमेरिकेतल्या जीवनाचा स्वीकार करून जगत असताना, बदलत्या काळाबरोबर विविध अनुभवांना तोंड देत असताना बदलली नाही ती फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार. लग्नानंतरच्या आयुष्यात निर्माण झालेले नवे भावबंध, नाती-गोती, मनावरचे मध्यमवर्गीय संस्कार जोपासताना परदेशातील आयुष्यात वाट्याला आलेली अटळ धडपड ही त्यांची वैयक्तिक जरी असली, तरी ती वाचकाला प्रातिनिधिक वाटेल. पण त्याही पलीकडे जीवनातल्या एका विशिष्ट अनुभवावर लिहिता-लिहिता त्यांचे भावविश्व इतके विस्तारले जाते की, तो सीमित अनुभव जणू सर्वस्पर्शी बनतो आणि वाचकाला अंतर्मुख करून टाकतो. ‘पानगळीच्या आठवणी’ ही भावनाप्रधान साहित्यकृती, जीवघेण्या विलक्षण अनुभवाचा वेध घेत सांगितली जाणारी ही प्रांजळ कथा हृदय हेलावून सोडते हे नि:संशय.