₹350.00
मुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम हे होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांची तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे. एका साध्या शाळकरी पोरापासून टोळीच्या दादापर्यंत दाऊदची उत्क्रांती कशी होत गेली, दाऊदने पोलिसांचा उपयोग करून आपल्या प्रतिस्पध्र्यांना कसे निपटले आणि शेवटी तो मुंबई पोलिसांचा एकमेव सूडकरी कसा बनला, याचे वर्णन यात आहे. हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा एक अधिकृत इतिहास आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा दाऊद याने पठाणांच्या टोळीला कसे निपटले, पहिली सुपारी कशी दिली गेली व शेवटी दुबईतून दाऊद कसा पाकिस्तानात पळून गेला, याचे थरारक वर्णन पुस्तकात आले आहे. पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी कमालीच्या बारकाईने हा सर्व इतिहास शोधून पुस्तकात आणला आहे. त्यांची ‘ब्लॅक फ्रायडे’ व ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ ही अन्य गाजलेली पुस्तके आहेत. त्यांच्या अन्य पुस्तकावर जसे चित्रपट निर्माण झाले तसाच चित्रपट याही पुस्तकावर तयार होत आहे.