₹150.00
मीरा मीरा म्हणजे भक्ती. भक्तीने परमात्मा साध्य करणारे अनेक आहेत आणि तरीही मीरा वेगळी आहे. का? ओशो सांगतात की भक्तिसाराची इतकी पारदर्शकता मीरामध्ये आहे, की ही पारदर्शकताच तिचं वेगळेपण सिद्ध करते. मीरा कृष्णमय आहे हे कुणी नव्याने सांगायला नको. पण आपण तिची भक्ती बघून मीरामय होऊन जातो हे निश्चित. भक्तिमार्ग हा सर्वांत कठीण मार्ग. न दिसणाया परमात्म्यावर तन, मन, भान विसरून प्रेम करणं, स्वत:ला त्याच्यावर सोपवून देणं हे कठीणच. आणि म्हणूनच मीराचं कृष्णासाठी केलेलं समर्पण अनमोल आहे. यमक जुळतंय की नाही याची विवंचना न करता जे हृदयातून उमटत गेलं असं ते काव्य, गीत, भजन आजही आपल्या हृदयाला भिडतात आणि मीरा म्हणते ‘मैं तो प्रेम दीवानी’. हा तिचा भाव, ही तिची भावदशा आपल्यालाही भारावून टाकते.