₹110.00
निबंध म्हणजे एखाद्या विषयावरचं प्रकट चिंतन. हे चिंतन तुमच्या शब्दांत गुंफणं हे कौशल्याचं काम असतं. सुंदर शब्द, यथोचित उदाहरणं, समर्पक सुविचारांची फुलं गुंफली की, निबंधाचा हार तयार होतो. या निबंधाविषयी तुम्हा विद्याथ्र्यांच्या मनात फार मोठी धास्ती असते. एखाद्या विशिष्ट विषयाविषयी काय लिहावं, कसं लिहावं, किती लिहावं आणि तरीही ते वाचनीय असायला हवं, असे त्या भीतीला चार स्वतंत्र पदर असतात. तुमच्या मनातील ही अदृश्य भीती घालवण्यासाठी आणि परीक्षेत मराठी निबंधात तुम्हाला उत्तम गुण मिळावेत यासाठी विविध विषयांवरच्या निबंधांचं हे पुस्तक आम्ही तुमच्या हाती आनंदानं देत आहोत. तुम्ही ते काळजीपूर्वक वाचा, त्यांचा अभ्यास करा आणि सर्वोच्च गुणांचे धनी व्हा!