DIGVIJAY – दिग्विजय

SKU: 9738
Publisher:
Our Price

450.00

Product Highlights

‘इटलीचीच काय; पण कोणतीही मोहीम हाती घ्यायची धडाडी असलेला असा एकच जनरल फ्रान्समध्ये आहे. त्याची उंची असेना का कमी; पण त्याच्या महत्त्वाकांक्षेची झेप विशाल आहे. त्याचा स्वत:चा नेम नसेना का चांगला; परंतु चढाई नेमकी कुठे आणि केव्हा करायची, हे तो उत्तम जाणतो. त्याची घोड्यावरची मांड कशी का असेना; पण संपूर्ण सैन्यावर त्याची विलक्षण पकड आहे. तो ओढीना का सारखा तपकीर; परंतु शत्रूच्या मात्र तो नाकी दम आणू शकतो!… …नेपोलियन बोनापार्टसारखा जनरल आपल्या हाती आहे, हे मी आपलं भाग्य समजतो. या माणसाच्या हाती आपण सैन्याची सूत्रं देऊ या. अन्यथा उद्या तो ती स्वत:हून आपल्या हातांत घेतल्याशिवाय राहणार नाही!’ प्रेम-विरह, फितुरी-हेरगिरी, डाव-प्रतिडाव, युद्ध-शांती अशा विविध अंगांनी नटलेली नेपोलियन बोनापार्ट याच्या जीवनावरील पिता-पुत्रांनी संयुक्तरीत्या लिहिलेली अद्भुतम्य, रससिद्ध कादंबरी : दिग्विजय!

Quantity:
in stock
Category: