MIRAGE – मिराज

SKU: 9692
Publisher:
Our Price

170.00

Product Highlights

मिराज म्हणजे मृगजळ. मैलोगणती पसरलेल्या रुक्ष वालुकामय प्रदेशात अतीप्रखर उन्हाचे वेळी, दूरवर दिसणारा पाण्याचा आभास. ज्याला खरं अस्तित्व नसतंय; पण असल्यासारखं वाटतं. लेखक बंडूला चंद्ररत्ना यांनी, वाळवंटी प्रदेशात घडणाऱ्या या कादंबरीला फार समर्पक शीर्षक दिलेलं आहे. खेड्यातल्या शांत, संथ वातावरणातून उपजीविकेसाठी नव्याने विकसित झालेल्या शहरातल्या धबडग्यात येऊन राहणाऱ्या दोन अश्राप जिवांची ही कथा. ते आणि त्यांची स्वप्नं यांची चित्तरकथा अंगावर शहारा आणते. सुख आणि स्वास्थ्य ही त्यांना शेवटपर्यंत मृगजळासारखी चकवत राहतात. पेट्रोडॉलर, उघड्यावर भरणारा सुवर्णबाजार यांच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आपण ज्या देशांविषयी ऐकतो, त्या तेल समृद्ध आखातील देशातलं हे दाहक आणि करून वास्तव. अत्यंत साधेपणाने सरळ, समोर आलेल्या त्या चकचकीत नाण्याची ही दुसरी बाजू. अक्षरश: जगातल्या सगळ्या देशातली माणसं जिथे पैसे कमवायला येतात, तिथल्या स्थानिक माणसांची काय गत होते याचं प्रभावी चित्रण यात वाचायला मिळतं. अशीच मोठी शहरं आपल्याही देशात आहेत. आसपासच्या खेड्यातून येणाऱ्या स्थानिक कुटुंबांची अशीच परवड होत असेल का? या विचाराने मला ही कादंबरी वाचत असताना झपाटलं आणि म्हणून मी ती अनुवाद करायला घेतली.

Quantity:
in stock
Category: