₹120.00
हिरव्या वनस्पती पाहणे कुणाला आवडत नाही? दृष्टीसुखाबरोबरच या वनस्पतींचे विज्ञान जाणून घ्यायला बाल दोस्तांना नक्कीच आवडेल. बालदोस्तांना हे विज्ञान सप्रयोग जाणून घेण्याची संधी मिळेल ‘प्रयोग – वनस्पती विज्ञानाचे’ या पुस्तकाद्वारे. वनस्पतींविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे प्रयोग कसे करावेत याचे सचित्र मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे. वनस्पतींचे अवयव आणि त्यांची रचना याविषयीची माहिती या पुस्तकातून मिळते. बियांचे पुनरुत्पादन असो किंवा बियांचे रुजणे किंवा त्यांचे अंकुरणे हे सगळे बाल दोस्तांना कळू शकते रंजक प्रयोगांतून. एक गंमत म्हणून स्पंज शेतीचा प्रयोगही या पुस्तकात सांगितला आहे. एकाच झाडाच्या मुळांना बटाटे आणि वरच्या भागाला टोमॅटो लागल्याचं नवल अनुभवायचं असेल तर ‘पोमॅटोचे झाड’ हा प्रयोग करा. असे अनेक प्रयोग या पुस्तकात समाविष्ट आहेत. हे सगळे प्रयोग करा महागड्या उपकरणांशिवाय आणि पर्यावरणाच्या खुल्या अंगणात. असे अनेक प्रयोग करण्यासाठी बालदोस्तांनी हे पुस्तक घेतलंच पाहिजे असं आहे.