₹240.00
‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष…‘नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर…डॉक्टरांनी `व्हेजिटेबल` ठरवलेला कोमातील रुग्ण…वीस वर्षांपूर्वी यासर्वांना वाचण्याची आशा नाही म्हणून मृत समजून सोडून दिलं असतं; पण अविश्वसनीय अशा नवीन वैद्यकीय प्रगतीमुळे हे सर्वजण आज जिवंत आणि धडधाकट आहेत. चित्त खिळवून ठेवणा-या या पुस्तकात न्यूरोसर्जन,सीएनएन चे प्रमुख वैद्यकीय बातमीदार आणि लोकप्रिय पुस्तकांचे लेखक डॉ. संजयगुप्ता, हे चमत्कार प्रत्यक्षात आणणा-या असामान्य विज्ञानाचं इतिवृत्त नोंदवतात. जेव्हा मृत्यूपासून बचावकरण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मानवी शरीर ज्या प्रकारे कार्यकरतं, त्या विषयीच्या आपल्या समजुती, हे अग्रेसर डॉक्टर आणि संशोधक कशा बदलून टाकतात, त्याचे वास्तव जीवनातील केसेस वरआधारित असलेले थरारक वृत्तान्त डॉ. गुप्ता सादर करतात. पूर्वी जे रुग्ण मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता होती, त्या रुग्णांचं जिवंत राहाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढत आहे, यावर ते प्रकाश पाडतात. पक्षाघात विंवाहृदयविकाराच्या झटक्यानंतर कोमात गेलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी च्या रोगनिवारक हायपोथर्मिआच्या प्रयोगापासून ते गर्भाला जीवदान देणा-या शस्त्रक्रिया आणि रणांगणांवरील जखमी सैनिकांना वाचवण्याच्या उद्देशाने करण्यात येणा-या प्राण्यांमधील सुप्तनिद्रेच्या अभ्यासापर्यंतच्या या सर्व विलक्षण गोष्टी वाचून जीवन-मृत्यूच्या वास्तव स्वरूपा विषयीची आपली गृहीतवं पार पालटून जातात.