₹180.00
मृत्यूच्या प्रत्यक्ष क्षणी आपण मृत्यूला जाणू शकत नाही, पण आयोजित मरण होऊ शकतं. या आयोजित मरणालाच ‘ध्यान’, ‘योग’, ‘समाधी’ असं म्हणतात. मृत्यू सावली आहे. आता सावलीपासून कुणी पळेल, तर कधी पळू शकणार नाही. याचा अर्थ असा नाही की, सावली बलशाली आहे. याचा अर्थ इतकाच की, सावली नाहीच. त्यामुळे तिला जिंकण्याचा प्रश्न येतच नाही. जे मुळातच नाही, त्याला जिंकता येत नाही. म्हणून लोक मृत्यूकडून हरतात, कारण मृत्यू म्हणजे जीवनाची सावली. म्हणून हे आवश्यक आहे की, आपण आपल्या स्वेच्छेने मृत्यूत उतरावं – ध्यानात; समाधीत!