DEATH OF AN OUTSIDER – डेथ ऑफ ॲन आउटसायडर

SKU: 9498
Publisher:
Our Price

170.00

Product Highlights

स्कॉटलंडमधील लॉचढभवासीयांचा लाडका इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथची बदली जवळच्या क्नॉथन शहरात काही दिवसांसाठी झालेली असते. मॅक्बेथ आपल्या टाऊझर कुत्र्यासोबत क्नॉथनला येता; पण क्नॉथनमध्ये त्याचं मन रमत नाही. हॅमिश मॅक्बेथ हा शांत, सुस्त व खुशालचेंडू वृत्तीचा माणूस आहे. क्नॉथनला आल्यावर त्याला लॉचढभच्या निसर्गसौंदर्याची व त्याच्या आवडत्या प्रिसिला हालवर्टन स्मिथच्या निव्र्याज प्रेमाची उणीव सतत भासत राहते. क्नॉथन शहरासारखीच तिथली माणसंही रुक्ष, धार्मिक आणि आतल्या गाठीची. दुसऱ्या शहरातून आलेल्या माणसांकडे ती नेहमी संशयानं व अविश्वासानं पाहत. हॅमिशलाही तोच अनुभव येतो. क्नॉथनमध्ये एक विचित्र व विक्षिप्त स्वभावाची व्यक्ती राहत असते– विलिमय मेनवेअरिंग. मेनवेअरिंग हा मूळ इंग्रज माणूस. आपली मावशी खिस्तवासी झाल्यावर तिची इस्टेट सांभाळण्यासाठी तो आठ वर्षांपूर्वी क्नॉथनला येऊन स्थायिक झालेला असतो. वेअरिंग अतिशय गर्विष्ठ व तुसड्या स्वभावाचा झालेला असतो. साऱ्या जगाचं ज्ञान आपल्या एकट्याला आहे, अशा तोऱ्यात तो वावरत असे. गावातल्या लोकांवर हुकमत गाजवायची एकही संधी तो सोडत नसे. त्यामुळे गावातल्या प्रत्येकाचीच त्याच्यावर खुन्नस होती. विलियम मेनवेअरिंगचा जेव्हा खून होतो, तेव्हा गावातल्या एकाही माणसाला दुःख होत नाही. त्याचा खून होणार हे जणू लोकांनी गृहितच धरलेलं असतं. पण मेनवेअरिंगला विचित्ररीत्या मारण्यात येतं. मोठमोठे लॉबस्टर्स असलेल्या हौदात त्याला बुडवण्यात येतं. हौदातले लॉबस्टर्स काही तासांतच मेनवेअरिंगला फस्त करून टाकतात. पण हेच लॉबस्टर्स जेव्हा लंडनमधल्या दर्जेदार हॉटेलमध्ये जाऊन पोहोचतात, तेव्हा या प्रकरणाची चव अधिकच वाढते. मेनवेअरिंगच्या खुनाचा छडा लावण्याची जबाबदारी जेव्हा हॅमिशवर येते, तेव्हा संशय यावा अशा अनेक व्यक्ती त्याच्या नजरेसमोर येतात. त्यातला नेमका खुनी कोण हे शोधणं हॅमिशसाठी मोठं आव्हान असतं. आणि ते आव्हान त्याला एकट्यालाच पेलावं लागतं. अनेक गुपितं माहीत असूनही गावातली माणसं मूग गिळून बसलेली असतात. मॅक्बेथच्या बॉसला खून प्रकरणाची उकल करण्यापेक्षा ते दाबून टाकण्यातच अधिक रस असतो. त्यातच एक काळ्याभोर केसांची लावण्यवती ललना त्याला वश करून घेण्यासाठी विवश झालेली असते. आणि तो अज्ञात खुनी तर कोणत्याही क्षणी आणखी एक बळी घेणार असतो. हॅमिश मात्र सर्व प्रतिकूल परिस्थितीवर शांतपणे मात करत आपल्या खास पद्धतीने खुन्याच्या हातात बेड्या ठोकण्यात यशस्वी होतो.

Quantity:
in stock
Category: