₹170.00
स्कॉटलंडमधील लॉचढभ नावाच्या एका लहानशा गावात टिक्सी व पॉल थॉमस हे जोडपं इंग्लंडमधून अवतरतं आणि गावचं वातावरण पार बिघडून जातं. उद्धट व कावेबाज टिक्सीला सारा गावच आपल्या मुठीत ठेवण्याची ईष्र्या असते. ती गावातल्या स्त्रियांना वश करून घेते. गावकNयांच्या अज्ञानाचा फायदा उठवून ती त्यांच्या घरात पिढ्यान्पिढ्या असलेल्या दुर्मिळ व मौल्यवान वस्तू पुकटात स्वतःच्या पदरात पाडून घेते. अशा विचित्र वातावरणात अचानक कुणीतरी टिक्सीचा खून करतं. पोलीस इन्स्पेक्टर हॅमिश वरिष्ठ अधिकायांच्या विरोधाला न जुमानता खुनाचा तपास कसा करतो, याचं चित्रण करणारी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.