₹170.00
स्कॉटलंडच्या सुंदर, निसर्गरम्य वातावरणात ही कथा उलगडते. जॉन आणि हेदर कार्टराईट हे दाम्पत्य स्कॉटलंड- मधील एका टुमदार खेड्यात मासेमारी प्रशिक्षण संस्था चालवीत असतं. या संस्थेत विद्यार्थी म्हणून रॉथ हे अमेरिकन दाम्पत्य, चार्ली नामक बारा वर्षीय मुलगा, जेरेमी हा देखणा तरुण वकील, एलीस एक गरीब नोकरदार तरुणी, डाफने ही ऑक्सफर्डमधील तरुणी, मेजर पीटर हा निवृत्त लष्करी अधिकारी आणि लेडी जेन ही विधवा स्त्री पत्रकार यांचा समावेश आहे. पात्रांत याखेरीज हामिश मॅक्बेथ हा त्या गावचा पोलीस इन्स्पेक्टरही आहे. वर्ग सुरू झाल्याच्या चौथ्या दिवशी अचानक लेडी जेनचा पुÂगलेला मृतदेह जॉनच्या गळाला लागतो. इन्स्पेक्टर मेक्बेथला पाचारण केलं जातं. नंतर शहरातून गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख ब्लेअर यांनाही बोलावलं जातं. पोलिसांना एकच पुरावा सापडतो… तो म्हणजे एक अर्धवट फाटलेला फोटो. या फोटोवरून पोलीस जेनच्या खुन्यापर्यंत कसे पोहोचतात, याचं उत्कंठावर्धक चित्रण करणारी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.