₹170.00
लॉचडभ हे स्कॉटलंडमधील एक छोटंसं गाव. त्या गावातील कर्नल हालबर्टन- स्मिथ आणि मेरी हालबर्टन- स्मिथ यांची तरुण, सुंदर मुलगी प्रिसिला हालबर्टन- स्मिथ ही लंडनमध्ये फॅशन पत्रकार म्हणून काम करत असते. लंडनमध्ये तरुण नाटककार हेन्री विदरिंगशी तिची भेट होते. हेन्री आणि प्रिसिला एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करायचं ठरवतात. प्रिसिला हेन्रीला घेऊन लॉचडभला येणार आहे, हे समजल्यावर प्रिसिलाचे आई-वडील तिचं आणि हेन्रीचं लग्न ठरल्याच्या आनंदात पार्टीचं आयोजन करतात. याच गावातील तरुण पोलीस इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथ हाही प्रिसिलावर प्रेम करत असतो. प्रिसिला आणि हेन्रीसाठी ज्या पार्टीचं आयोजन केलेलं असतं, त्या पार्टीसाठी बरेच लोक जमलेले असतात. त्यांच्यात कॅप्टन पीटर बार्टलेट नावाचा माणूस असतो. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी पीटर आणि अन्य काही जण शिकारीसाठी जाणार असतात; पण दुसऱ्या दिवशी सकाळी पीटरचा मृतदेह जंगलात सापडतो. हॅमिशच्या मते तो खून असतो. पीटरचा खून झाला आहे, हे हॅमिश कसं सिद्ध करतो आणि खुन्यापर्यंत कसा पोहोचतो, प्रिसिला आणि हेन्रीचं काय होतं, हे जाणून घेण्यासाठी ‘डेथ ऑफ अ कॅड’ ही कादंबरी वाचली पाहिजे.