NOTHING TO LOSE – नथिंग टू लूज

SKU: 9362
Publisher:
Our Price

350.00

Product Highlights

‘होप’ आणि ‘डिस्पेअर’च्यामध्ये जी सीमारेषा होती, ती खरोखरच रस्त्याच्यामध्ये एक रेषाच होती. एका गावाचा रस्ता संपून दुसNया गावाचा जिथे सुरू होतो, तिथे ती सीमारेषा तयार झाली होती. ‘होप’ म्हणजे ‘आशा’ तर ‘डिस्पेअर’ म्हणजे ‘निराशा.’ जॅक रीचरला कोणतेही वाहन न मिळाल्यामुळे त्याला चालत जावे लागते, फक्त एक कप कॉफी साठी. पण त्याला रेस्टॉरंटमध्ये आलेल्या चौकडीमार्पÂत जाळ्यात अडकवले जाते. चूक… चूक… चूक… ते चुकीच्या माणसाला धरतात. जॅक रीचर हा त्याच्या क्षेत्रात मोठा असतो कामधंदा नसलेला, कायमस्वरूपी पत्ता नसलेला, सामानसुमान नसलेला फक्त मनस्वी जिज्ञासू. भटकेपणाचा आरोप ठेवून त्याला गावातून हद्दपार केले जाते. अशी कोणती गुपितं आहेत की जी स्थानिक प्रशासनाने दडवून ठेवली आहेत? मिलिटरीतून निवृत्त झालेला अतिशय कठोर वृत्तीचा जॅक रीचर हे नाजूक धागे पकडून अमेरिकेच्या सर्वात मोठ्या प्रतिष्ठा धुळीला मिळविणा-या धक्कादायक आणि गूढ प्रकरणाचे कारस्थान उकलण्यासाठी सज्ज होतो. कारण काहीही झालं तरी जॅक रीचरला काहीच गमवावं लागणार नव्हतं. एक रहस्यमय थरारकथा म्हणून या पुस्तकाकडे बघता बघता त्या वाटेने सुरू झालेला प्रवास देशभक्ती, कडवे धर्मवेड अशा अनेक भावनांपाशी, आग्रहांपाशी येऊन थांबतो. कोणतीही गोष्ट जेव्हा अतिरेकाकडे झुकते तेव्हा ती दुराग्रहामध्ये रूपांतरित होते. या दुराग्रहांचे, माथेफिरू धर्मवेडाचे जे दर्शन या पुस्तकात घडते ते भयचकित करणारे आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ एक रहस्यमय थरारकथा राहात नाही; तर ते मानवी प्रवृत्तींना आव्हान देत राहते.

Quantity:
in stock
Category: