NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS – नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस

SKU: 9326
Publisher:
Our Price

240.00

Product Highlights

सिद्धहस्त कथालेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या कादंबऱ्यांपैकी ही एक अत्युत्तम कादंबरी. फसवेगिरीच्या आणि बदनामी होऊ शकेल, अशा गुंतागुंतीच्या घटना घडतात आणि मग त्यांचा व्यवस्थित बदला घेतला जातो, तो कसा; ह्याची अत्यंत कौशल्यपूर्ण गुंफण.ऑक्सफर्डचा एक प्रोफेसर, लंडनमधील एक प्रतिष्ठित उच्चभ्रू डॉक्टर, एक फेशनेबल फ्रेंच आर्ट – डीलर आणि मोहक व्यक्तिमत्त्व असलेला एक इंग्लिश लॉर्ड – ह्या सगळ्यांमध्ये समान धागा तो काय असणार? तसं पाहिलं, तर कुठलाच नाही! पण ह्या सगळ्यांना हार्वे मेट्काफ नावाच्या, आंतरराष्ट्रीय शेअरबाजारात अफाट उलाढाल्या करणाऱ्या लपंग्यानं संपूर्णपणे लुंगवलेलं असतं! आणि त्यांचे पैसे परत मिळण्याची त्यांना थोडीही आशा नसते! – की असते? –आणखी नुकसान होणं शक्यच नसतं, म्हणून ही चार अगदी आगळी-वेगळी माणसं एकत्र येतात, आणि काही अफाट, भन्नाट योजना आखतात. त्या योजना पार पाडता-पाडता, ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या विख्यात इमारती, जुगाराचे जगप्रसिद्ध अड्डे असलेलं माँटे कार्लो, पॅरिसमधल्या एका हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर, लंडनच्या उच्चभ्रू आर्ट गॅलऱ्या , अ‍ॅस्कॉटच्या घोड्यांचं रेसकोर्स, तसंच, विम्बल्डनच्या टेनिस कोर्टावरही जाऊन पोचतात! हे सगळं कशासाठी? हार्वे मेट्काफनं चोरलेले त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी! – अगदी एक न् एक पैसा!

Quantity:
in stock
Category: