₹300.00
‘‘गी, मी लक्ष्मी मित्तल बोलतो आहे. मी केवळ औपचारिकपणे तुझ्या कानावर घालण्यासाठी हा फोन केला आहे, की उद्या मित्तल स्टील तुझ्या भागधारकांच्यासमोर आर्सेलरच्या शेअर्ससाठी थेट प्रस्ताव मांडणार आहे.’’ –लक्ष्मी मित्तल ‘‘भारतीय वंशाचा एक उद्योजक, जगातील पहिल्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक झाला आहे, याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे…’’ –अर्थमंत्री पी.सी. चिदंबरम “एक वर्षापूर्वी फ्रान्समध्ये तू आगंतुक होतास; पण आता परिस्थिती बदललेली आहे,“ असं म्हणत जॅक शिराकने हसून मित्तलशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाला, “आता फ्रान्समध्ये सर्वत्र तुझं स्वागतच केलं जात आहे.“ –फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक `‘ही तर एक प्रकारची लढाईच आहे,“ जॉन कास्टेगन्रोने जाहीर केलं. “आपण आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढलं पाहिजे.“ मित्तलचा प्रस्ताव आर्सेलरच्या संचालक मंडळाने एकमुखाने फेटाळून लावला.