₹250.00
बरेच जण असे मानतात की, विज्ञानाने माणूस व परमेश्वर यांच्यामध्ये पाचर मारून त्या दोघातील अंतर वाढवत नेले आहे. कुठे आहे तो परमेश्वर? तो मृत्यू पावला आहे का? धर्म आणि श्रद्धा या केवळ अपूÂसारख्या आहेत. चारशे वर्षांपूर्वी विज्ञानाची प्रगती होऊ लागली. तोपर्यंत दैवी शक्तीचा प्रभाव जगावर सर्वत्र होता. पण नंतर हळूहळू माणसाचा देवावरचा विश्वास ढळू लागला. देवाची जागा विज्ञानाने घेतली. परंतु खुद्द विज्ञान हा एक भ्रामक देव ठरला. परिणामी मानवजात निराश झाली. मणी भौमिक या शास्त्रज्ञाने ‘एक्सायमर लेसर’चा शोध लावला. डोळ्याचा चश्मा घालवण्याची शस्रक्रिया शोधून काढली. अशा या शास्त्रज्ञाने परमेश्वराचे अस्तित्व विज्ञानाच्या आधारे शोधायचा प्रयत्न केला. त्याची ही एक थरारक कहाणी!