₹395.00
नोबेल पारितोषिक विजेते हिज होलीनेस दलाई लामा आणि आर्चबिशप डेस्मंड टुटू यांनी आयुष्याची तब्बल पन्नास वर्षं निर्वासित अवस्थेत काढली. तरी ते दोघेही या पृथ्वीतलावरचे सर्वांत प्रसन्नचित्त लोक आहेत. २०१५ मध्ये दलाई लामा यांचा ८० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आर्चबिशप टुटू धरमसालाला जाऊन पोहोचले. आयुष्यातल्या अटळ दुःखांच्या पार्श्वभूमीवर आनंद कसा शोधावा, या ज्वलंत प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दोघांनीही आपापल्या जीवनप्रवासाचा दीर्घ आढावा घेतला. स्वागताच्या आलिंगनापासून ते अखेरच्या निरोपापर्यंतचा त्या दोघांनी व्यतीत केलेला अभूतपूर्व आणि विस्मयकारक आठवडा अनुभवण्याची अपूर्व संधी हे पुस्तक आपल्याला देतं.