₹320.00
साधारण दहा वर्षांपूर्वी मूळ प्रकाशित झालेले ‘पीस, लव्ह अँड हीलिंग` हे पुस्तक आपल्यामध्ये स्वत:ला बरे करण्याची शक्ती अंगभूतच आहे, हा क्रांतिकारी संदेश देते. अनेक शास्त्रीय अभ्यासांतून हे आता सिद्धही झालेले आहे. मन, बुद्धी आणि शरीर यांतील परस्पर संबंध आता संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडूनही स्वीकारले जात आहेत. याच तत्त्वाचा पुन्हा परिचय करून देताना डॉ. बर्नी एस. सिगल चेतना, मनोसामाजिक घटक, वृत्ती आणि प्रतिकार यंत्रणा यांमधील संबंधावरील सध्याच्या संशोधनावर प्रकाश टाकतात. सिगल म्हणतात, ‘प्रेम आणि मन:शांती आपले नक्कीच संरक्षण करीत असते. जीवनाच्या खडतर प्रवासामध्ये समस्यांचा सामना करायला यामुळेच ताकद येते. यामुळे आपल्याला टिकून राहण्यास शिकवले जाते, वर्तमानामध्ये जगायला प्रोत्साहन मिळते आणि आलेल्या प्रत्येक दिवसाचा सामना करायला नव्याने जोम येतो.