₹260.00
जंगल हे ठिकाण असे असते जिथे तुम्ही जरा चुकीचे वागल्यास कोनाच्या तरी तोंडचा घास होऊ शकता! कारण या जंगलात असतात, घातक शिकारी प्राणी, चिडलेले हत्ती आणि जगातले सर्वात बेभरवशाचे प्राणी – म्हणजे, बेलगाम पर्यटक आणि अविचाराने धाडस करणारे सफारी गाईड! या सगळ्यांचे चित्रण लेखकाने या पुरतकात केले आहे. अंगावर धावून येणार-या सिंहाचा लेखकाने दोन वेळा कसा सामना केला, ब्रिटिश राजघराण्यातून आलेल्या झिंगलेल्या अर्धनग्न पर्यटकांचा रात्रीच्या अंधारात कसा शोध घेतला, पर्यटकांनी भरलेली लँडरोव्हर गाडी पाणघोडे असलेल्या जलप्रवाहात घेऊन गेल्यावर कशी तारांबळ उडाली, आणि आफ्रिकेतल्या सर्वात धोकादायक प्राण्याला त्याने आपला पाळीव प्राणी कसे बनवले, असे विविध अनुभव लेखक गोष्टीरूपात सांगतो. नर्मविनोदी शैलीतले हे अनुभव वाचताना कधी भीतीने अंगावर काटा उभा राहतो, तर कधी कधी हसून-हसून पुरेवाट होते, तर कधी डोळ्यात पाणी उभे राहते. चला तर, आफ्रिकेतल्या जंगलातली शब्दसफरी अनुभवायला!