₹90.00
दैनंदिन वापरातील माहितीची यंत्रे, काही माहिती नसलेली आणि काही कारणाने वापरात येणारी यंत्रे यांची रचना, उपयुक्तता, त्या यंत्रांबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबतची सचित्र माहिती देणारे पुस्तक म्हणजे ‘साधी यंत्रे.’ अगदी गॅसच्या जमान्यातही पंपाचा स्टोव्ह, वातीचा स्टोव्ह याचीही माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. आता ऊर्जाबचतीचं महत्त्व जाणवू लागलेलं असताना सूर्यचुलीची माहिती हे पुस्तक देतं. शाळकरी मुलांना आणि काही मोठ्या माणसांनाही यंत्र उघडून बघायची उत्सुकता असते; पण त्याची शास्त्रशुद्ध रचना माहिती असेल तर ते यंत्र खोलणं आणि बंद करणं योग्य रीतीने होऊन, त्यातील बिघाड टळतो. अगदी अडकित्ता, सांडशी, ओपनरपासून वॉशिंग मशिन, मिक्सर ग्राइंडरपर्यंत अनेक यंत्रांची माहिती या पुस्तकातून मिळते. भाल वाचकांना या वस्तूंची ओळख करून देणे, त्यांचे सामन्यज्ञान वाढावे. त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, हा या पुस्तकाच्या लेखनामागील हेतू असला, तरी मोठ्यांच्याही सामान्यज्ञानात भर घालणारे हे पुस्तक आहे. साध्या, सोप्या भाषेत यंत्रांची माहिती देणारे हे पुस्तक वाचनीय आहे.