₹395.00
‘मी जेव्हा एका पत्र्याच्या, पाणी झिरपणा-या होडग्यातून ‘लव्हेट बे’ला घर पाहायला निघाले, तेव्हा मला माहीत नव्हतं की, माझा प्रवास सुरू झाला होता. फिकट पिवळा रंग, भक्कम खांब आणि प्रशस्त व्हरांडा असलेल्या उंच खडबडीत टेकडीवरच्या त्या बंगल्यात माझ्या नव्या आयुष्याची पहाट होणार होती.’ हृदयद्रावक, गमतीदार आणि दाहक प्रामाणिक! ‘साल्व्हेशन क्रीक’ ही अशा एका स्त्रिची गोष्ट आहे, जिच्यात यशस्वी कारकिर्दीचा त्याग करुन नव्याने आयुष्य सुरु करण्याची हिंमत आहे. ही अशा एका स्त्रिची कथा आहे. जिच्यात जगण्यासाठी लढतांना अडचणींवर एकटीने मात करण्याचं धैर्य आहे आणि सर्व जगापासून दूर अशा छोट्याशा निसर्गरम्य किना-यावर तिला सापडलेल्या नव्या आयुष्याची – नव्या प्रेमाची कहाणी आहे. ‘प्रेरणादायक, प्रामाणिक आणि खरंखुरं अगदी लेखिकेसारखंच’ – विल्यम मॅक्लन्नेस ‘ए मॅन्स गॉट टू हॅव अ हॉबी’ या पुस्तकाचा लेखक