₹60.00
प्राचीन काळापासून आपल्याकडे अंकशास्त्राचा अभ्यास होत आलेला आहे. गणितात शून्याची कल्पना हा प्राचीन भारतीयांचा फार मोठा शोध मानला जातो. अंक याचा मूळ अर्थ चिन्ह किंवा खूण असा आहे. नाणेघाटात सापडलेल्या एका शिलालेखावरून हिंदू लोकांना सनपूर्व ३०० पासून अंकशास्त्राचा व्यावहारिक परिचय झाला होता असे दिसते. या अंकशास्त्राच्यामागे कोणते रहस्य दडले आहे, ते या छोटीखानी, अल्पमोली पण बहूगुणी पुस्तकात सांगितले आहे.