SONIA GANDHI – सोनिया गांधी

SKU: 8048
Publisher:
Our Price

350.00

Product Highlights

राणी सिंग यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘सोनिया गांधी’ यांचे जीवनचरित्र हे एका अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाच्या स्त्रीचे हृदयस्पर्शी चित्रण आहे. हे वाचकाला सोनिया गांधी यांच्या जीवनाकडे बघण्याची एक नवी अंतर्दृष्टी प्रदान करते… त्याचबरोबर ही एका वेदनामय जीवनाची, एका कुटुंबाची आणि प्रगतीपथावर वाटचाल करत असलेल्या एका राष्ट्राची कहाणी आहे. – हेन्री किसिंजर, माजी यु.एस. सेक्रेटरी ऑफ स्टेट जगातील काही मोजक्या, सामथ्र्यशाली स्रियांपैकी एक असलेल्या या स्त्रीच्या जीवनाची कवाडे राणी सिंग यांनी वाचकांसाठी खुली केली आहेत. आजवर त्यांच्या जीवनाविषयी लिखित स्वरूपात फारशी माहिती उपलब्ध नव्हती. – जॉन स्नो, इंग्लंड येथील बातमीदार राणी सिंग यांच्या सखोल आणि अभ्यासपूर्ण संशोधनातून हे चरित्र आकारास आले आहे. काही वर्षांपूर्वी अप्रसिद्ध असलेल्या सोनिया गांधींची गणना थोड्याच कालावधीत आशिया खंडातील आणि अर्थात संपूर्ण जगातील निवडक सामथ्र्यशाली स्रियांमध्ये होऊ लागली. सोनियांच्या परिवर्तनाची ही कहाणी राणी सिंग यांनी आपल्या चित्रदर्शी, हृद्य भाषेत कथन केली आहे. प्रसंगी कठोर तरीपण न्याय्य, समीक्षात्मक तसेच परिणामकारक अशा शैलीतील हे लेखन म्हणजे विद्वत्ता आणि शोधपत्रकारिता यांचा अभूतपूर्व मिलाफ आहे. – प्रणय गुप्ते, ‘अल् अरेबिया इंग्लिश ’चे मुख्य संपादक आणि ‘मदर इंडिया’ या इंदिरा गांधी यांच्या राजकीय चरित्राचे लेखक ‘हे चरित्र म्हणजे एका भिडणा-या जीवनकहाणीला सलाम आहे…! पृष्ठभागावरच्या प्रवाहापेक्षा भिन्न दिशेने वाहत असलेला पृष्ठभागाखालचा एक जलप्रवाह आहे… त्याने भारतीय राजकारणात खळबळ निर्माण केली आहे… त्याची ही कहाणी आहे.’ सोनिया गांधींच्या भारतीय राजकारणावर असलेल्या प्रभावाची ही कहाणी आहे. – जेम्स ब्य्रुअर, पत्रकार आणि ‘लॉईड्स लिस्ट’चे संपादक

Quantity:
in stock
Category: