₹400.00
‘अठरा विश्वे दारिद्र्य’ असे सर्रास बोलले, लिहिले जाते. कोणती अठरा विश्वे? नावे सांगता येतील? नाहीतच, तर कोठून सांगणार? मग हा शब्दप्रयोग आला कोठून? डॉ.म.बा. कुलकर्णी सांगतात, ‘अठराविसे’ असा शब्दप्रयोग असायला हवा. अठराविसे · ३६०. म्हणजे बाराही महिने दारिद्र्य! ‘शब्द’ हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शब्दाला रंग-रूप असते. रस-गंध असतो. त्यामुळे ते जाणीवपूर्वक वापरता आले पाहिजेत. शब्दकोशामध्ये तर सर्वच शब्द असतात, पण तेथे ते एक प्रकारे निर्गुण-निराकार अवस्थेत असतात. देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जसे दगडाच्या मूर्तीला ‘देवत्व’ प्राप्त होते, तसेच शब्दांचे आहे. वापरातून त्यांच्यात प्राणप्रतिष्ठा होते. ते सजीव होतात. बोलू लागतात, डोलू लागतात. ही किमया डॉ.म.बा. कुलकर्णी यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहे.