₹160.00
‘बुद्धिबळ खेळ’ म्हणजे दोन बुद्धिवंतांमधील लढा आहे. बुद्धिबळ खेळ एक श्रमिक कार्य होऊ शकते किंवा बुद्धिबळ खेळ श्रमपरिहारक मौजेची लूट होऊ शकते. तेव्हा बुद्धिबळाचा डाव म्हणजे माणसाच्या मेंदूला उत्तम व्यायाम घडवून त्याचा तल्लखपणा वाढविणारा सोज्ज्वळ करमणुकीचा उच्च प्रकार होय. हे सारे नवोदितांना सहज समजण्यासाठी ‘बुद्धिबळ शिका’ हे खास पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात बुद्धिबळ खेळण्याची तंत्रे व सूत्रे अनेक आकृत्यांनिशी समजावून सांगितली आहेत. खेळाचे नियमही दिले आहेत. प्रत्येक प्रकरणाशेवटी स्वाध्यायासाठी चाचणीप्रश्न टाकले आहेत आणि जिज्ञासू वाचकांना आपापली उत्तरे पडताळून पाहता यावीत, म्हणून अखेरीस त्या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत. कुठलाही खेळ म्हटला, की त्यात करमणूक ही आलीच; परंतु करमणुकीबरोबर बुद्धिचापल्य, मनाची एकाग्रता. सोशिकपणा व तर्कशास्त्राचा योग्य उपयोग या गोष्टीही बुद्धिबळाच्या खेळातून सहज साध्य होतात, हे लक्षात घेतले पाहिजे. हे सारे पाहून ज्यांना हा खेळ शिकण्याची तीव्र इच्छा होते, अशा नवोदितांसाठी किंवा नियमित खेळाडूंसाठी हे मार्गदर्शक पुस्तक तयार केले आहे. त्यांना ते आवडेल आणि उपयुक्त ठरेल, आणि मार्गदर्शक म्हणून नित्य हाताशी ठेवावेसे वाटेल.