₹200.00
डॅनियन ब्रिंकली आणि कॅथरिन ब्रिंकली या दाम्पत्याने लिहिलेल्या ‘सिक्रेट ऑफ लाइट’ या पुस्तकाचा विषय मृत्यूनंतरचे जीवन हा आहे. धर्म, देवावर विश्वास नसलेले, आध्यात्मिकतेचा गंध नसलेले, विवेकहीन, बेफाम आयुष्य जगणारे डॅनियन दोनदा मृत्यूच्या समीप जाऊन आले. त्यानंतर तणावमुक्ती केंद्रांची स्थापना करण्याचे प्रचंड मोठे कार्य त्यांनी केले. ‘ट्विलाईट बिग्रेड’ची स्थापना केली. मृत्युशय्येवर असलेल्या देशातील सैनिकांना धैर्याने मृत्यूचा सामना करता यावा, यासाठी त्यांना मदत करणे हे या संघटनेच्या स्वयंसेवकांचे काम होते. गेली तीस वर्षे मृत्युशय्येवरच्या कित्येक व्यक्तींना ते त्यांच्या पुढील प्रवासाची माहिती देतात. मृत्यूविषयी त्यांची भीती दूर करतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचे मृत्यूनंतरचे जीवन सुकर करतात. परलोकातील आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्याची सोपी पद्धत, त्याचसोबत पारलौकिक प्रकाशाच्या दिव्य आQस्तत्वांशी संपर्क साधण्याचा मार्गही त्यांनी दिला आहे. एकूणच, पारलौकिक जगाविषयीची माहिती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रत्येकानेच काही ना काही केले पाहिजे असा संदेश देणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.