₹250.00
ती चार वर्षांची असताना तिला मरून जावंसं वाटलं. आपल्यावर प्रेम करणारे आईवडील आपल्याला मिळतील अशी लहानग्या खिस्तीनची अपेक्षा होती, पण आधी आनाथालयांमध्ये आणि नंतर बाहेरच्या जगात ठोकरा खाताना तिच्या वाट्याला काय आलं, तर फक्त अवहेलना, तिरस्कार, अपमान आणि विलक्षण एकाकीपणा. एकाकी खिस्तीननं इंग्लंडच्या इतिहासातील सर्वांत भयंकर खुन्याशी आपलं नातं आहे असं मानलं. त्या परिस्थितीपेक्षा आयुष्यात आणखी भीषण ते काय असणार असं तिला वाटलं खरं, पण सत्य काय ते तिला लवकरच कळणार होतं.