BLUEBIRD – A MEMOIR – ब्लु बर्ड – अ मेमॉयर

SKU: 7886
Publisher:
Our Price

220.00

Product Highlights

“बोस्निया-हरझेगोविना या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाल्यावर लेखिका आणि तिची बहीण निर्वासित म्हणून इंग्लंडला आल्या. इंग्लंडला आल्यावर तिथली संस्कृती, राहणीमान हे आपल्यापेक्षा भिन्न आहे हे त्यांना समजले. या भिन्नतेमुळे लेखिका आणि तिची बहीण यांना अनेक मजेदार प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. त्याच स्मृतिचित्रांचे वर्णन लेखिकेने केले आहे. इंग्लंडसारख्या देशात बोलली जाणारी भाषा हेच सर्वांत मोठे आव्हान लेखिकेपुढे होते. वेळोवेळी सॉरी, प्लीज, थँक्यू सारखे शब्द वापरणे, हा त्यांच्यासाठी विनोदच होता. परंतु केवळ एकच वर्षात लेखिका ही भाषा सराईतपणे बोलू लागली. पुढे ती अनुवादाचे कामही करू लागली. अपरिचित, अनोळखी अशा ठिकाणी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी नाइलाजाने स्थलांतरित झालेली लेखिका इंग्लंडच्या संस्कृतीशी- वातावरणाशी एकरूप झाली. शिक्षणाद्वारा तिने आपली प्रगती साधली. बोस्नियाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नवे अनुभव घेत तिने इंग्लंडमधील संस्कृती आपलीशी केली. या तिच्या जीवनप्रवासाचे वर्णन तिने तिच्या शब्दांत मांडले आहे. “

Quantity:
in stock
Category: