₹100.00
मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षण आणि संस्कार यांचा वाटा मोठा असतो. त्यादृष्टीने शिक्षक आणि पालक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. नव्या शतकाची नवी आव्हाने मुलांसमोर पंख फैलावून उभी आहेत. त्या आव्हानांना स्पर्श करण्याचा आत्मविश्वास मुलांना शिक्षक आणि पालकांनी दिला पाहिजे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये अभ्यास व परीक्षेचा ताण पालक, मुले दोघेही अनुभवत असतात. हा ताण कमी करण्यासाठी व अभ्यासाच्या काही सोप्या व रंजक पद्धती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करू शकेल. तसेच मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरायला हरकत नाही.