₹395.00
सुदूरच्या ‘युनायटेड विंÂग्डम’मधल्या निसर्गसुंदर ‘वेल्स’ परगण्यातलं एक टुमदार शहर ‘स्वान्सी’. अनपेक्षित योगानं माझं तिथे जाणं झालं. काही काळ निवांत राहणं झालं. आसपासही थोडं भटकणं झालं. तिथल्या निसर्गाचे विभ्रम मी पाहिले. ‘वेल्श’ लोकांची जीवनशैली न्याहाळताना कुतूहलापोटी स्वान्सीवासीयांशी कधी संवाद साधले. अनेकदा एकटीनं केलेल्या भटवंÂतीमुळे स्वत:शीही संवाद होत राहिला. एक लक्षात आलं, ज्या नगरीशी माझं कोणतंही नातं नव्हतं, जी माझी जन्मभूमी नव्हती की कर्मभूमी; त्या ‘स्वान्सी’नं हलकेच माझ्या मनात जागा मिळवली. कायमची. तिथल्या अनुभवांना दिलेलं हे शब्दरूप – स्वान्सीतील दिवस