SIX MACHINE – सिक्स माशिन

SKU: 7742
Publisher:
Our Price

395.00

Product Highlights

“कसोटी सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षट्कार ठोकणारा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे. पण अशा अनेक गोष्टी सहज शक्य करून दाखवणं, हा वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूच्या रोजच्या जीवनाचाच एक भाग झालाय. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पहिलं शतक झळकवण्याचा मान ख्रिस गेलकडे जातो. विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत त्यानेच प्रथम २०० धावा काढल्या. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. टी२० क्रिकेट सामन्यात कोणत्याही फलंदाजाने मारलेल्या षट्कारांपेक्षा, त्याने दुप्पट षट्कार लगावले आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्येही त्याने दोन तडाखेबंद त्रिशतकं काढलेली आहेत. हे सर्व विक्रम करताना त्याच्या हातात क्रिकेटमधील सर्वांत वजनदार बॅट होती आणि चेहऱ्यावर सदा फुलणारं हास्य होतं. जगभर प्रवास करणाऱ्या ख्रिस गेलचे इन्स्ट्राग्राम व ट्विटरवर लाखो चाहते आहेत. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच्या धडाकेबाज फलंदाजीची व नाइटक्लबमधील त्याच्या धमाल मस्तीची एक तरी झलक पाहायला-ऐकायला मिळावी यासाठी त्याचे चाहते कायम उत्सुकतेने वाट पाहत असतात. खेळपट्टीवर टिच्चून उभा राहत तो दीर्घ काळ फलंदाजी करतो, रात्रभर पार्टीत मौज करतो; दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा उठून प्रथम एका मोठ्या पॅनकेकचा फडशा पाडतो आणि मग दुर्दैवी गोलंदाजांची दुर्दशा करण्यासाठी पुन्हा मैदानात पाऊल ठेवतो. किंगस्टनच्या धुळीनं भरलेल्या रस्त्याच्या टोकाला, पत्र्याचं छप्पर असलेल्या एका घरात राहणाऱ्या, आपल्या तीन भावांबरोबर एकाच बिछान्यावर झोपणाऱ्या व पोटाची सोय करण्यासाठी रिकाम्या बाटल्या बाजारात विकणाऱ्या एका लाजऱ्याबुजऱ्या मुलाला, क्रिकेट जगतातील उच्च स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, याची कथा. ही कथा केवळ एका असामान्य क्रिकेटपटूची नाही, तर विषमता व भेदभावाविरुद्ध झगडणाऱ्या, शून्यातून आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करणाऱ्या व हे सर्व करताना आपलं स्वत्व हरवू न देणाऱ्या एका लढवय्याची आहे. “

Quantity:
in stock
Category: