₹160.00
‘डिस्ट्रिक्ट लेक’चा निसर्ग शब्दांतून आणि प्रत्यक्षातही जपणारी बियाट्रिक्स पॉटर… अमृताच्या रक्षणासाठी अवतरलेला ‘मोहनीराज’ आणि पैसाचा खांब जपणा-या नेवाशातलं ऊन आणि धूळ… दमयंतीची तलम चोळी… सोन्याचे पैंजण चितारणारा रविवम्र्याचा कुंचला आणि पक्ष्याच्या मरणाचे भान आलेली चिमुकली आर्या… अशा विविधरंगी तपशिलांचे ‘मिनिएचर पेंटिंग’ असावा असा एकेक लेख… जीवनाचे रंग घेऊन ज्ञानदा नाईकांच्या कुंचल्यासारख्या लेखणीतून उतरतो, तो थेट वाचकांच्या हृदयात….!