₹220.00
क्लिंटन फोर्ब्ज स्त्रियांबाबत बेलगाम आयुष्य जगणारा माणूस असतो. त्याच्या घराजवळच कार्टराइट पती-पत्नी राहत असतात. ते त्याचे कुटुंबमित्रच असतात. एक दिवस क्लिंटन, कार्टराइटच्या पत्नीला घेऊन गायब होतो आणि दुसरीकडे नाव बदलून राहायला लागतो. ऑर्थर कार्टराईट योगायोगाने क्लिंटनच्या शेजारी राहायला जातो. क्लिंटनचा कुत्रा रात्रभर विव्हळत असतो, अशी तक्रार घेऊन तो पेरी मेसनकडे जातो. त्या कुत्र्याच्या विव्हळण्याविषयी शहानिशा करायला गेलेला पेरी मेसन नंतर तीन खुनांच्या गुंत्यात अडकतो. कार्टराईट पती-पत्नी आणि क्लिंटन फोर्ब्ज यांचा खून होतो. कोणी केलेले असतात हे तीन खून आणि कशासाठी, हे अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मेसनला शोधून काढावे लागते. मेसनच्या या शोधाची चातुर्यपूर्ण, धाडसी कथा म्हणजे ‘द केस ऑफ द हाऊलिंग डॉग’.