₹80.00
सदसद्विवेकबुद्धी जागी करणाऱ्या, नौतिक मूल्यांचा संस्कार करणारया कथा मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा “अस्थी` हा खास कुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह. सत्ता, पैसा, मोठेपणा, यांच्या राक्षसी हव्यासापोटी माणूस कधीकधी आपल्या जिव्हाळ्याच्या नात्यागोत्यांचा, सद्विवेकबुद्धीचा आणि माणुसकीचाही गळा घोटतो. मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेत टाकून त्या व्यक्तीला मुक्ती दिल्याचं समाधान तरी मानता येतं, पण मेलेल्या माणुसकीच्या अस्थी कोठे टाकायच्या ?… लेखक वि. स. खांडेकर आपल्या कथांतून असे मूलभूत प्रश्न उपस्थित करत वाचकांच्या सदसद्विवेकबुद्धीला जाग आणतात आणि अलगद त्यांच्या मनावर उच्च नौतिक मूल्यांचे संस्कार करतात.