₹240.00
आपल्या स्पष्ट आणि निडर स्वभावाला अनुसरून डॉ. किरण बेदी अनुभवाला आलेल्या अनेक आक्षेपार्ह बाबींवर, भावलेल्या विषयांवर कळकळीने लिहीत असतात. साध्या अनलंकृत शैलीतील हे लेखन सामाजिक अन् नैतिक विषयावरील त्यांची मते मांडत असते. या विषयांवर जनतेने जागृत होऊन विचार करावा, सजग व्हावे आणि एकत्र होऊन कृतिशील व्हावे हा हेतू मनात धरून त्या लिहीत असतात. देशातील सर्वसामान्यांना माहीत असलेल्या, नसलेल्या समस्यांवर लिहिलेले वाचताना, वाचकांना डॉ. किरण बेदींची एक संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख होते. त्यांचे लिखाण वाचकांना सरकार, प्रशासन याबद्दल विचारप्रवृत्त करते.