₹180.00
अरुणा शानबागसारखं प्रकरण हे वैद्यकीय व्यवसायातलं एकमेव प्रकरण असेल! पण तरीही त्यावर म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही. अशा प्रकारचं आयुष्य जगणा-या रोग्यांसाठी दयामरणाचा निर्णय योग्य म्हणता येईल की अयोग्य यावर म्हणावी तेवढी चर्चा झालेली नाही. बलात्काराविरूद्धच्या कायद्यातील पळवाटांबाबतही योग्य तो उपाय झालेला नाही. अरुणाची ना धड मृत आणि ना धड जिवंत अशी अवस्था करणा-या नराधमाला मात्र केवळ सात वर्षांची शिक्षा झाली! तीही चोरी आणि मारहाणीच्या कृत्यांबद्दल. बलात्कार केल्याचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा आरोप कोणी त्याच्यावर ठेवलाच नाही. अशा प्रश्नांची उठाठेव करण्याची गरज आहेच कुणाला? पिंकी विराणींचे हे पुस्तक या अशा धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडते.