₹250.00
‘अनू’प ही विलक्षण आत्मकथा आहे अनू अगरवाल यांची. दिल्लीहून मुंबईला आलेल्या अनूचं अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय मॉडेल बनणं…पहिल्याच `आशिकी` या सुपरडुपरहिट चित्रपटाद्वारे रातोरात `स्टार` बनणं…त्यानंतर ग्लॅमरचा त्याग करून योगाश्रमात राहणं… तिथून मुंबईला परत आल्यानंतर दुर्दैवी कार अपघात होणं… कोमात गेलेल्या आणि छिन्नविच्छिन्न झालेल्या अनू पुन्हा बऱ्या होणं… त्यांनी परत आत्मशोधासाठी सज्ज होणं… संन्यास घेणं आणि त्यानंतर मुंबईत योगाचे धडे द्यायला लागणं… अनू यांच्या आत्मशोधाची… मृत्यूचा उंबरठा शिवण्याच्या अनुभवाची आणि पुन्हा जीवनरसानं फुलणाऱ्या चमत्काराची ही कहाणी.