ANOLKHI SWARGAMANDIRAT – अनोळखी स्वर्गमंदिरात

SKU: 7063
Publisher:
Our Price

300.00

Product Highlights

१९८६मध्ये सुझन जेन गिलमन आणि सहाध्यायी चीनच्या लोकराज्यापासून साहसी पदभ्रमणाची सुरुवात करतात. त्या वेळी चीन स्वतंत्र बॅकपॅकर्ससाठी अवघा १० मिनिटांसाठी खुला असे. नित्शेचे एकत्रित साहित्य आणि लिन्डा गुडमनचे `लव्ह साइन्स` एवढीच सामग्री बरोबर घेऊन त्या शांघायच्या धुळीच्या रस्त्यावर झेप घेतात. स्वाभाविकच त्या स्वत:ला अडचणीत आणतात – उपासमार, गोंधळ, सर्वत्र अनोळखी वातावरण आणि सततचे सरकारी निरीक्षण यांना सामोरे जातात. लवकरच त्यांचे विखरणे सुरू होते, एकीचे शारीरिक तर दुसरीचे मानसिक पातळीवर. त्यांचा प्रवास जसजसा अधिक भीतिदायक होतो, तसतसे अशा संकटांना सामोरे जावे लागते की, सुझनला त्यातून वाचणे अशक्य वाटू लागते. पण तिलाही अद्यापि अज्ञात असणारी शक्ती गोळा करून — आणि अनपेक्षित मित्रांची मदत घेऊन — हे दोनही प्रवासी त्या चिनी अंधारक्षेत्रातून (हार्ट ऑफ डार्वÂनेसमधून) बाहेर येण्याचा मार्ग शोधतात. ‘अनड्रेस मी इन द टेम्पल ऑफ हेवन’ ही परिवर्तन घडवणारी, अजाणपणा, मैत्री आणि मुक्ती यांची सत्यकथा आहे; जिच्यामध्ये सुझनची करुणा आणि विनोद ही वैशिष्ट्ये आहेतच.

Quantity:
in stock