₹180.00
मेरी बर्गची डायरी वाचताना, विश्वास बसणं कठीण असा इतिहासाचा काळाकुट्ट कालखंड वाचकांच्या डोळ्यांपुढे अक्षरश: जिवंत होतो, कमालीचा अस्वस्थ करतो. अस्थिर, संभ्रमित अवस्था, उपासमार, रोगराई आणि मृत्यू ह्यांचे भोवताली तांडव; या सगळ्या परिस्थितीत, मेरी बर्गने कोणत्या अंत:प्रेरणेने तिच्या बारा छोट्या वह्यांत सातत्याने घटनांची नोंद केली असेल? चिखलातून कमळ उमलावं, तशी मेरी बर्ग या विनाशकारी परिस्थितीत देखील आशावाद न सोडता तग धरून राहिली. तिच्या सुदैवाने अमेरिकेला पोहोचल्यावर तिची डायरी संशोधित आणि संपादित होऊन पुस्तकरूपात प्रकाशित झाली. इतर अनेक भाषांत प्रकाशित झालेल्या ‘द डायरी ऑफ मेरी बर्ग’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद प्रकाशित होऊन तो वाचकांपर्यंत पोहोचणं, हा मराठी साहित्य प्रवासातील एक वैशिष्ट्यपूर्ण ‘माइल स्टोन’ ठरावा.