THE PRICE OF LOVE – द प्राइस ऑफ लव्ह

SKU: 6944
Publisher:
Our Price

220.00

Product Highlights

वडिलांच्या हिंसाचाराचा व्रण, त्यातच शाळेत गुंड मुलांनी धाकदपटशा दाखवून केलेला लैंगिक अत्याचार, बलात्कार अशा अवस्थेत निकोलाकडे मदतीसाठी कोणताच मार्ग नव्हता. स्वास्थ्य हरवलेल्या तिच्या वर्तनाकडे तिच्या अवतीभवती असणा-या वडीलधा-यांनी दुर्लक्ष केले. तिची आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मान रसातळाला गेला. त्यानंतर थरकाप उडवणा-या एका अनोळखी माणसाच्या छळाची ती शिकार झाली. त्याने तिचे आयुष्य जिवंत नरक बनवले. नील देखणा आणि भुरळ पाडणारा होता. पण धोक्याचा इशारा ओळखण्याच्या वयाची ती नव्हती. तिच्या या नव-याने तिला टोकाच्या यातना दिल्या. आपले तिच्यावर प्रेम आहे, म्हणून हे सारे आपण करीत आहोत, असेही तो उलट आग्रहपूर्वक सांगत होता. अत्यंत प्रतिकूल स्थितीत भयानक छळाच्या यातनांतून जाऊनही आपले स्वत्त्व आणि आंतरिक शक्ती कायम ठेवणा-या एका स्त्रीची अंत:करण पिळवटून टाकणारी कहाणी म्हणजे `द प्राइस ऑफ लव्ह’ ही कादंबरी.

Quantity:
in stock
Category: