₹595.00
क्लेरिकुझिओ या अमेरिकेतील सर्वांत प्रबळ अशा माफिया पॅमिलीशी संबंधित क्रॉस हा तरुण असतो. अथेना अॉक्वटेन या अतिशय सुंदर आणि नामवंत अभिनेत्रीवर त्याचं प्रेम जडतं. अथेनाचा नवरा बॉझ स्वॅनेट तिचा छळ करत असतो. क्रॉस त्याचा काटा काढतो. अथेनाच्या ऑटिस्टिक मुलीसह अथेनाचा स्वीकार करायचा आणि तिच्याबरोबर जीवन व्यतीत करायचं, अशी त्याची इच्छा असते. दरम्यान, क्रॉसच्या वडिलांची हत्या होते. ती क्लेरिकुझिओ फॅमिलीतील सदस्याने, दान्तेने केलेली असते. दान्तेला ठार मारण्याची योजना क्रॉस आखतो. त्याचवेळी दान्तेनेही क्रॉसच्या खुनाची योजना तयार केलेली असते. कोणाची योजना यशस्वी ठरते? माफिया वल्र्डचं थरारक चित्रण करणारी जबरदस्त कादंबरी.