AND THEREBY HANGS A TALE – ॲन्ड देअरबाय हँग्ज अ टेल

SKU: 6932
Publisher:
Our Price

220.00

Product Highlights

‘जाता जात नाही…’ची कथा भारतातील. दिल्लीच्या एका ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबलेले असताना जामवाल आणि निशा प्रेमात पडतात…. या पंधरा कथांपैकी एकीची ही सुरुवात. जेफ्री आर्चर यांना त्यांच्या जगभराच्या भ्रमंतीतून मिळालेल्या गोष्टींचा हा सहावा लघुकथासंग्रह – ‘पारखी नजर’ ही गोष्ट जर्मनीत घडते. एक अमूल्य तैलचित्र एका कुटुंबात दोनशे वर्षं असतं. पण एके दिवशी…. ‘फक्त सदस्यांसाठी’ या खाडीतल्या बेटावरच्या एका तरुणाला नाताळच्या पोतडीत गोल्फ बॉल मिळतो, आणि त्याचं आयुष्यच बदलून जातं…. ‘हाउसफुल्ल’ची गोष्ट इटलीतील. हॉटेलात खोली घ्यायला गेलेला एक तरुण थेट तिथल्या रिसेप्शनिस्टच्या बिछान्यात पोहोचतो…. ‘हाय हील्स’ इंग्लंडमध्ये घडणारी घटना. बुटांचे जोड सहजासहजी का जळून जाऊ शकत नाहीत, हे एक स्त्री तिच्या नव-याला सांगते…. काही गोष्टींनी तुम्हाला हसू येईल… काहींनी डोळ्यांत पाणी येईल… पण त्या तुम्हाला खिळवून ठेवतील, हे नक्की!

Quantity:
in stock
Category: