THE NAMESAKE – द नेमसेक

SKU: 6860
Publisher:
Our Price

270.00

Product Highlights

…तसं पाहायला गेलं तर त्याचा सारा जीवनप्रवास अपघातांच्या मालिकेनंच भरलेला. सुरुवात झाली बाबांच्या गाडीला अपघात झाला त्या घटनेपासून. …गोगोल हे नावही अपघातानंच त्याला मिळालं त्याच्या पणजीनं निवडलेलं नाव त्यांना अखेरपर्यंत समजलं नाही. कलकत्ता ते केंब्रिज ह्या प्रवासात तिचं पत्र कायमचंच गहाळ झालं. ह्या एका अपघाताचे परिणाम गोगोलला अनेक वर्षं भोगायला लागले. नाव देताना आयत्या वेळी बाबांना त्यांचा अपघात आठवला, ज्याच्या पुस्तकामुळं ते जीवानिशी वाचले त्या गोगोलच्या नावानं त्याचं नामकरण झालं. या विचित्र नावानं त्याला खूप छळलं. मोठा झाल्यावर त्यानं ती चूक दुरुस्त केली; तरीही `गोगोल` नावानं त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही… …भविष्यात काय घडणार हे कधीच माहीत नसतं. सारं काही अचानक सामोरं येतं. त्यासाठी कोणत्याही प्रकारची तयारी करता येणं शक्य नसतं; परंतु तेच अनुभव गाठीशी बांधून त्यामागील कार्यकारणभाव शोधायला पुढचं सारं आयुष्य पडलेलं असतं आणि मग ध्यानात येतं की कधी घडायलाच नको होत्या अशा वा कोणतंही प्रत्यक्ष कारण दिसत नसताना घडलेल्या घटनांनीच आयुष्य भरलेलं आहे.

Quantity:
in stock
Category: