₹395.00
थॉट लीडर्स` या पुस्तकात आहे तरी काय? “नव्या कल्पना प्रत्यक्षात आणणं आणि आव्हान स्विकारणं, स्वतंत्र होण्याची अथवा स्वायत्ततेची गरज आणि जीवनाचा दर्जा सुधारणं, या गोष्टींची अत्यंतिक निकड … या पुस्तकात भारतातील २२ दृष्ट्या व्यवस्थापकांच्या कार्याचा आलेख आहे. या व्यक्ती निरनिराळ्या व्यवसायातील आहेत, यांची पार्श्वभूमीही भिन्न-भिन्न आहे. या भारतीय व्यक्तींना असं खास स्थान कशामुळे मिळालं त्यावर दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात व्यवस्थापक व नेते यांच्या जीवनातील महत्वपूर्ण वळणं, त्यांना प्रेरक ठरणारे घटना-प्रसंग यांचं चित्रण आहे… या सगळ्यातून सुरु झालेला हा वैचारिक नेतृत्वांचा प्रवास आणि त्यांची यशोगाथा यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या जाणीवेच्या सूक्ष्म, सखोल थरांपर्यंत पोचून, समृद्ध आणि दैदिप्यमान कामगिरी घडविण्यासाठी सहाय्यभूत ठरणा-या घटकांविषयी `थॉट लीडर्स` आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करते.