₹220.00
स्टार व्यवसाय शोधून रिचर्ड कोचने १०० मिलियन पौंडांपेक्षा जास्त पैसे कमविले. या त्यांच्या नव्या पुस्तकात ते त्यांच्या यशाचं गमक सांगताहेत. तुम्हीही स्टार शोधून कसे श्रीमंत होऊ शकता हे दाखवून देत आहेत. वेगाने वाढणा-या व्यवसायाच्या क्षेत्रात, स्टार व्यवसाय कार्यरत असतात. ते त्यांच्या क्षेत्रात, बाजारात सर्वांत पुढे असतात. स्टार दुर्मिळ असतात. या पुस्तकाचे सावकाश, शांतपणे वाचन करा. तुम्हीही स्टार शोधू शकाल किंवा तुमचा नवा स्टार निर्माण करू शकाल. उद्योजक होऊ इच्छिणा-यांकरिता किंवा गुंतवणूकदारांकरिता (मोठे किंवा मध्यम) हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. स्टार व्यवसायात काम करण्याचे लाभ कळणा-या महत्त्वाकांक्षी कर्मचा-यांसाठी हे पुस्तक मौल्यवान आहे. जबाबदारीचा अनुभव, वेगाने होत जाणारी वैयक्तिक प्रगती, चांगला पगार, भरपूर बोनस, शेअर प्राप्त होण्याची शक्यता असे अनेक लाभ स्टार व्यवसाय तुम्हाला प्राप्त करून देतो. तुम्ही कोणीही असा. स्टार शोधा, त्यात गुंतवणूक करा. तुमचं जीवन सर्वांगानी मधुर व वैभवशाली होईल. रिचर्ड कोचने फिलोपॅक्स, बेल्गो रेस्टॉरंट, प्लायमाऊथ जीन आणि युरोपमधील सर्वांत मोठा व नफेशीर इंटरनेट गँबिंलग व्यवसाय, बेटपेअर हे स्टार व्यवसाय केले. त्याचं नशीब उजळलं. मूळ गुंतवणुकीच्या कितीतरी पटीने पैसे मिळाले.