₹90.00
तिसरा प्रहर हा आयुष्याचे यथार्थ दर्शन करून देणारा आरसा आहे. दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी मनुष्य जर क्षणभर अंतर्मुख झाला. तर पुर आलेल्या नदीतून पोहणाऱ्याच्या भावनांचा, विशेषत: अर्धेअधिक अंतर तोडल्यावर त्या पोहणाऱ्याच्या मनात येणाऱ्या विचारांचा कल्लोळ आपल्याही त्हदयामध्ये प्रतिध्वनित होत आहे. तिसऱ्या प्रहरामध्ये आपली चाल मंदावलेली असते. यौवनातील स्वप्न वितळून जातात. म्हणजेच आपल्याला तिसऱ्या प्रहरामध्ये निष्क्रीय व निराशा वाटू लागते. विषयांची विविधता आणि शौलीची भिन्न भिन्न वौशिष्ट्ये असे खांडेकरांच्या लघुनिबंधाबाबत म्हणता येईल. खेळकर कल्पकता, नाजूक जिव्हाळा, आणि मार्मिक विचारदर्शन हे लघुनिबंधाचे प्रमुख गुण आहेत. लघुनिबंध हा वौचित्र्यपूर्ण व्यक्तित्वाचा विकसित रसिकतेचा आणि अनुभवसंपन्न आत्म्याचा अधिकार आहे. असे वि. स. खांडेकरांना वाटते.