₹120.00
सर्व गोष्टी ‘मूल्य’ या संकल्पनेशी निगडीत असतात. कुठल्याही उद्योगाचा अथवा सरकारी संस्थेचा ‘मूल्य’ निर्मितीवर भर असतो. आणि आता वाढत्या प्रमाणात आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातही त्या गोष्टीला महत्त्व देत असतो. हे जरी खरं असलं, तरी ‘मूल्य’ ही अस्पष्ट आणि अनाकलनीय संकल्पना आहे. पारंपरिक विचारपद्धतीला छेद देत, आपल्या या पुस्तकाद्वारे लेखक एडवर्ड डी बोनो यांनी एका वेगळ्याच विचारपद्धतीची साधी पण आकर्षक चौकट आपल्यासमोर मांडलेली आहे. सर्वसामान्य व्यक्ती तसेच उद्योगसमूहाचे नेतृत्व करणाNयांसाठीही मूल्यांच्या आधारावर, सर्जनशील आणि परिणामकारक निर्णय घ्यायला या नवीन विचारपद्धतीचा नक्कीच फायदा होईल. थोडक्यात ‘द सिक्स व्हॅल्यू मेडल्स’ ह्या पुस्तकामुळे तुम्ही अगर तुमचा उद्योग यशस्वी होण्यासाठी, मूल्यांचा योग्य रितीने वापर करून सुधारणेला वाव असलेल्या बाबी अचूक शोधू शकता, परिणामी तुमची कार्यक्षमताही वाढते.