₹160.00
’उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी’ हा अ. वा. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. या संग्रहाला त्यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकात उपयोजित समीक्षेच्या व्याखेसह तिची सोदाहरण चर्चा त्यांनी केली आहे. गंगाधर गाडगीळांच्या साहित्यकृतींवर झालेल्या समीक्षेचा आढावा घेणारा लेख या संग्रहात आहे. प्रसिद्ध नाटकांची समीक्षा करताना ते गडकरी आणि तेंडुलकर, या दोन टोकांना भिडताना दिसतात. तर कादंबरी विभागात भिन्न बाजाच्या कादंबर्यांचं विश्लेषण करतात. जसे ’झोंबी’ (डॉ. आनंद यादव, ’शापित’(अरुण साधू) इ. कथा या साहित्य प्रकारात ’सतरावे वर्ष’ या पु. भा. भावे यांच्या कथेचं आकलन ते मांडतात. ’सय’ या वि. शं. पारगावकरांच्या ललित निबंध संग्रहाचा अभ्यासपूर्ण धांडोळा ते घेतात, तर ’आहे मनोहर तरी…’ या सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राची सखोल चिकित्सा करतात. ’विंदा करंदीकरांची गझलरचना’ या लेखात गझलचा रचनेच्या दृष्टीने ते विचार करतात आणि ’केशवकुमारांचे काव्यलेखन’ या लेखांतून केशवकुमारांच्या विडंबनात्मक काव्याची वैशिष्ट्ये नोंदवतात. तर असा हा संग्रह अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त तर आहेच, पण सर्वसामान्य वाचकांनीही वाचावा असा आहे.