₹220.00
आपल्या संपूर्ण शरीररूपी `वाद्यवृंदाचे` कार्य पूर्णपणे नियंत्रित करणारा `मास्टर` मेंदू हाच आहे. मेंदूत बिघाड झाला तर लय-ताल सर्व लयाला जातात. मेंदू थांबला की, माणूसही संपला- पूर्ण विराम! वरवर दिसणाऱ्या सर्व शारीरिक क्रियांखेरीज अदृश्य अशा सर्व क्षमता, बुद्धीचे सर्व आविष्कार, विचार, भावभावना, स्मरणशक्ती, भाषा यांचा कर्ता-करविता, सर्वेसर्वा मेंदूच आहे. `अफलातून मेंदू` या पुस्तकात डॉ. अनिल गांधी यांनी मेंदू आणि मन यांच्या कार्याचा उलगडा करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यात मेंदूची व मनाची रचना, कार्य, विकार यांच्याविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. पुस्तकाची भाषा सामान्य वाचकांना समजावी अशीच आहे. अतिसामान्य व्यक्तीसही मेंदूचे भयानक असे जन्मजात विकार टाळण्याच्या अतिशय साध्या सोप्या आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या प्रतिबंधक उपचारांची माहिती करून देणे, हाही लेखकाचा हेतू आहे.